लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे मेट्रोच्या काही स्थानकांच्या बांधकामामध्ये असलेल्या त्रुटी महामेट्रोने दुरुस्त केल्या आहेत. या कामाचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओईपी) परीक्षण करण्यात आले आहे. त्याचा अहवालही मेट्रोला मिळालेला आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली आहे.

पुण्यातील काही ज्येष्ठ अभियंत्यांनी मेट्रोला पत्र लिहून स्थानकांच्या कामातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. याबाबत या अभियंत्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. यानंतर महामेट्रोने स्थानकांची तपासणी केली. या तपासणीमध्ये कामात काही कमतरता आणि त्रुटी आढळल्या. या त्रुटी कौशल्य प्रकारात मोडणाऱ्या असून, त्यामुळे स्थानकाच्या मूळ ढाच्याला कोणताही धोका संभवत नाही, असा दावाही महामेट्रोने केला होता. मेट्रोने या त्रुटींची नोंद घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करत संबंधित कंत्राटदारांना सूचना केल्या होत्या. परंतु, तरीही कंत्राटदारांकडून कामात सुधारणा दिसली नाही त्यामुळे मेट्रोने दोन कंत्राटदारांचे कंत्राट रद्द केले.

आणखी वाचा- पुण्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोने कामातील कमतरता आणि त्रुटी दूर करीत स्थानकांचे काम पूर्ण केले. या कामाचे परीक्षण करण्यासाठी महामेट्रोने राज्य सरकारची मान्यता असणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नेमणूक केली. त्यांच्या पथकाने वेळोवेळी स्थानकांमध्ये येऊन त्या कामांचे परीक्षण केले. मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. मेट्रोने केलेली दुरुस्ती योग्य असून मेट्रोची स्थानके सुरक्षित आहेत, असे सीओईपीच्या अहवालात म्हटले आहे.