आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांचे दीर, माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी घोरपडी गाव परिसरात वास्तव्याला असलेल्या एका तरुणाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणारा अटकेत ; तीन गुन्हे उघड

याबाबत माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडीगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी उपलब्ध करुन दिलेल्या मोबाइल क्रमांकावर आरोपी शेखने संदेश पाठवून खंडणीची मागणी केली. सुरुवातीला त्यांनी संदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता़

हेही वाचा >>> शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार; आरोपीस अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मोबाइल क्रमांक समीर शेख याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. शेख याच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शेख याच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.