पुण्यात उभारलेल्या मोदी मंदिरातून मूर्ती हटवली; PMO कडून फोन आला अन्…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एका समर्थकाने मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती

Pune, Narendra Modi, Aundh, Pune,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एका समर्थकाने मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती

पुण्यात उभारलेलं मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील एका समर्थकाने मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती. औंध परिसरात उभारण्यात आलेले हे मंदिर शहरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता या मंदिरातील मूर्ती हटवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे.

Modi Temple : पुण्यात पंतप्रधान मोदींचं मंदिर; दर्शन अन् सेल्फीसाठी पुणेकरांची गर्दी

भाजपाने संबंध नसल्याचं केलं होतं स्पष्ट

पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटं मंदिर उभारण्यात आलं होतं. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला होता. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.

नक्की पाहा > पुण्यातील मोदी मंदिराचे खास फोटो

१ लाख ६० हजारांचा खर्च

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता.

मयूर मुंडे यांनी मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावली होती. तसंच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली होती. मंदिराची उभारणी खासगी जागेत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune narendra modi temple removed after call from pmo in aundh pune sgy

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा