भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमा दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या.शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही.तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती.आता १०/१० कोटी रुपये देणारे लोक आहेत.असे विधान केल्यानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेते आणि संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले असून आज पुण्यातील कोथरूड येथील चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न; काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, भाजप नेत्यांकडून सतत महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केली जात आहे.त्या नेत्यावर भाजप श्रेष्ठीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.त्याच दरम्यान आता भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या महापुरुषांनी आपल्या सर्वासाठी शिक्षणाची दार खुली केली.त्यांच्याबद्दल विधाना केल आहे.आम्ही त्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करित असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करावी अशी आमची मागणी असल्याच त्यांनी सांगितले.