पुणे : पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘सर्वंकष स्वच्छता’ मोहिमेच्या पहिल्या दिवशी शहरातील दोन प्रभागांतून २४ टन कचरा, १६ टन राडारोडा यांसह बेकायदा जाहिरात फलक, बॅनर काढण्यात आले. पुणे स्टेशन परिसर, तसेच ताडीवाला रोड, बंडगार्डन परिसरातील प्रभाग क्रमांक २० आणि २१ मध्ये ही स्वच्छता करण्यात आली. महापालिकेच्या सहा विभागांचे ७६४ कर्मचारी, अधिकारी एकाच वेळी रस्त्यावर उतरून यामध्ये सहभागी झाले होते.

महापालिकेतील घनकचरा, विद्युत, पथ, आकाशचिन्ह, अतिक्रमण, तसेच उद्यान विभागातील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. अलंकार चौक ते पोलीस आयुक्तालय चौक, बंडगार्डन पाणीपुरवठा चौक ते जहांगीर चौक, तसेच रुबी हॉल हॉस्पिटल ते सिटी पॉइंट चौक या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात ही स्वच्छता करण्यात आली. शहरातील परिमंडळनिहाय (झोन) ही मोहीम राबविली जाणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे.

Pune Municipal Corporation takes action against seven private hospitals in Pune for violating rules Pune print news
पुण्यातील सात खासगी रुग्णालयांकडून नियमभंग! महापालिकेने उचलले कारवाईचे पाऊल 
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
mumbai High Court ordered government to set up committee to consider phased ban on diesel and petrol vehicles
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य? वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश
municipal administration launched Kacharamukt Tas campaign
कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका

हेही वाचा…पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?

मोहिमेच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक २० मध्ये ६ टन, तर प्रभाग २१ मध्ये १० टन राडारोडा उचलण्यात आला. ओला, सुका, गार्डन वेस्ट असा २४ टन कचरा दोन्ही प्रभागांतून उचलण्यात आला. याबरोबरच रस्त्यावर बेवारस, नादुरुस्त असलेली वाहने, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, लोखंडी स्टॉल, पथारी, तसेच इतर अडथळा ठरणाऱ्या गोष्टी हटविण्यात आल्या. बेकायदा पद्धतीने लावण्यात आलेले ३५ जाहिरात फलक, १२३ फलक काढले. बंडगार्डन ते प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दोन्ही बाजूंना ४२ झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यात आल्या. पथ विभागाच्या वतीने १३० चौरस मीटर रस्त्याची डागडुजी आणि २५ चौरस मीटर पदपथाची दुरुस्ती करण्यात आली.

पालिकेतील महत्त्वाच्या विभागांचे कर्मचारी एकत्र आणि एकाच दिवशी रस्त्यावर उतरल्यास मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा शहर स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो. या उद्देशाने एकाच दिवशी पालिकेतील विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम राबवतील, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिमंडळ एकमध्ये ९ ते १४ डिसेंबर दरम्यान ही मोहीम सुरू राहणार आहे.

हेही वाचा…Rohingya in Pune: रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर, भारतीय पासपोर्टही मिळवले

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रभाग क्रमांक २० आणि २१मध्ये ‘सर्वंकष स्वच्छता’ करण्यात आली. सहा विभागांचे पावणेआठशे कर्मचारी एकाच वेळी रस्त्यावर उतरले होते. सध्या परिमंडळ एकमध्ये ही मोहीम सुरू आहे. संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग

Story img Loader