पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील मिळकतींनाही कर आकारणी सुरू झाल्याने या गावातील निवासी मिळकतींना मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत योजना लागू करण्यात आली आहे. त्यासाठी समाविष्ट गावातील मिळकतधारकांना सवलतीसाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, महापालिकेने यापूर्वीच शहराच्या जुन्या हद्दीसाठी या योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

समाविष्ट गावातील मिळकतींच्या नोंदी ठेवण्याची प्रक्रिया महापालिका प्रसासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मांजरी, वाघोली, सूस-म्हाळुंगे, बावधन आदी भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून येथील मिळकतींची संख्याही अन्य गावांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे येथील मिळकतींच्या नोंदी ठेवण्याच्या कामाला विलंब होत असून ग्रामपंचायतीकडे असलेल्या नोंदीनुसार मिळकतींची महापालिकेच्या नियमानुसार कर निश्चिती केली जात आहे. त्यासाठी मिळकत शोधून त्याला नोटीस दिली जात असून सुनावणी घेण्यात येत आहे.

हेही वाचा : पुण्यातील वाड्यांच्या पुनर्विकासाला गती…महापालिकेने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

समाविष्ट गावातील मिळकतींना टप्प्याटप्प्याने कर आकारणी केली जाणार असून त्यांनाही मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत लागू करण्यात आली आहे. त्यासाठी येथील मिळकतधारकांना पीटी-३ अर्ज भरावा लागणार आहे. मात्र कर निश्चितीची प्रक्रिया सुरू असल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा : पुण्याच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणारा गजाआड; पाच दुचाकी जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाविष्ट गावात एकूण २ लाख ९३४ मिळकती असून, निवासी मिळकतींची संख्या १ लाख ८२ हजार १६४ एवढी असून, १४ हजार ३५१ व्यावसायिक मिळकती आहेत. मिश्र वापराच्या ३ हजार ७१९ मिळकतींची नोंद महापालिका प्रशासनाकडे आहे.