पुणे : मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील मालदा येथून एकाला ताब्यात घेतले. अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया याच्या संपर्कात पश्चिम बंगालमधील संशयित आरोपी असल्याचे आढळून आले आहे. सुनील बर्मन असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बर्मनला अद्याप याप्रकरणात अटक करण्यात आली नसून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात सात आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. बर्मन फरार आरोपींपैकी एक असल्याचे सांगण्यात आले.

पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली येथे छापे टाकून मेफेड्रोन तस्करी उघडकीस आणली. पोलिसांनी तीन हजार ७०० कोटी मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हेही वाचा…पुण्यात ‘एम्स’ उभे राहणार! अजित पवारांची मोठी घोषणा

धुनिया हा मुंबईतील एकाच्या संपर्कात होता. तो नेपाळमार्गे कुवेतला पसार झाला आहे. पश्चिम बंगालमधून ताब्यात घेण्यात आलेला बर्मन पुण्यात येऊन गेल्याचे उघडकीस आले आहे. तो अन्य आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader