पुणे शहरात हडपसर आणि कोथरूडमधील दागिन्यांच्या दुकानातून सोन्याच्या अंगठ्या चोरी करणार्‍या दोघांना जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. यातील दोघे आरोपी हे वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत आहेत. या भावी डॉक्टरांनी मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी या चोर्‍या केल्याची माहिती समोर आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात ८ डिसेंबरला दुपारच्या वेळी चोरी करण्यात आली. अनिकेत हणमंत रोकडे (वय २३, मूळचा लातूर) आणि वैभव संजय जगताप (वय २२, मूळचा वाशीम) अशी या प्रकरणातील २ आरोपींची नावे आहेत. ते बीएएमएस आणि बीएससी नर्सिंग शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहेत.

चोरीचा सीसीटीव्ही व्हिडीओ पाहा:

दोन्ही आरोपी व्यसनाधीन आहेत. त्यांच्याकडे मैत्रिणीला गिफ्ट द्यायला पैसे नव्हते. त्यामुळे दोघांनी चोरी करण्याचं ठरविले. त्यानुसार दोघांनी हडपसर आणि कोथरूड येथील दागिन्यांच्या दुकानात चोरी करण्याचे ठरविले.

चोरीची ‘मोडस ऑपरेंडी’ काय?

दोघांपैकी एक जण आतमध्ये जायचा आणि दुसरा बाहेर असलेला साथीदार दुचाकी चालू करून ठेवयाचा. आतमधील आरोपी अंगठी खरेदी करायची आहे त्यासाठी ट्रे मधील काही अंगठ्या पाहण्यास घ्यायचा. यानंतर समोरील व्यक्तीची नजर चुकवून तो दुकानातून पळ काढायचा.

हेही वाचा : गँस टँकरमधून दररोज २०-२५ सिलेंडर गॅस लंपास, काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना बेड्या, १ कोटींचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये आरोपींनी अंदाजे ३६ ग्रॅम वजनाच्या ४ अंगठ्या चोरल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना पकडण्यात यश आले आहे.