पुणे : शहरातील एका प्रसिद्ध सनदी लेखापालसह (चार्टर्ड अकाउंटंट) त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत ३० लाखांची खंडणी मागणार्‍याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. गरवारे पूल परिसरात पैसे नेण्यासाठी आला असता त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

किरण रामदास बिरादार (वय २४ रा. मांजरी. मूळ. रा. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मुकुंदनगर येथील एका चार्टर्ड अकाउंटंटने तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरोपी बिरादारने अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी करून तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलांना व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सातत्याने धमक्या येत असल्याने तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. आलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. या दरम्यान आरोपीने गुरुवारी तक्रारदाराला दूरध्वनी करून पैसे घेवून गरवारे पूल परिसरात बोलावले. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने गरवारे पूल परिसरात सापळा रचून बिरादार याला ताब्यात घेतले. पोलीस असल्याचा संशय येताच आरोपी मोबाइल फेकून पळून जावू लागला. मात्र,  पथकाने पाठलाग करून बिरादार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव