पुणे : क्वीन्स गार्डन भागात दीड महिन्यांपूर्वी भिक्षेक ऱ्याचा खून करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी जेजुरी परिसरात पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवा ऊर्फ पोपट महादेव पवार (रा. नागाव निमणी, तासगाव, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शिवा पवार भिक्षेकरी आहे. त्याने दीड महिन्यांपूर्वी मध्यरात्री क्वीन्स गार्डन भागात लोहमार्गालगत असलेल्या मंदिराच्या कठडय़ावर झोपलेल्या सोनू कुशवाह (वय २८, मूळ रा. उत्तर प्रदेश) याचा डोक्यात दगड घालून खून केला होता. एका सामाजिक संस्थेतर्फे पुणे स्टेशन भागातील भिक्षेकरी तसेच गरजूंना अन्नपदार्थाचे वाटप करण्यात येते. अन्नपदार्थाची पाकिटे घेण्यासाठी येणाऱ्या भिक्षेक ऱ्यांना पवार दमदाटी करत होता. कुशवाहने त्याला दमदाटी करू  नको, असे सांगितले होते. त्यामुळे चिडलेल्या पवारने मध्यरात्री झोपेत असलेल्या कुशवाहच्या डोक्यात दगड घालून १८ मार्च रोजी खून केला होता. या प्रकरणाचा कोरेगांव पार्क पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पवार जेजुरी रेल्वेस्थानक भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक जेजुरीत रवाना झाले. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक प्रशांत लंघे, दिनेश शिंदे, विनोद साळुंके, अनिल मंदे, संदीप गायकवाड यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police crack murder at queens garden pune
First published on: 02-05-2018 at 03:24 IST