पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणी सोमवार पेठेतील गुंड वैभव उर्फ पिंट्या माने याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून, अमली पदार्थ तस्करीमागे आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याचा संशय आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गुंड वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याचे साथीदार अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पवार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा…पुणे : वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस कर्मचारी विठ्ठल साळुंखे यांनी अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी. दिली.