पुणे : मिळकतकरातून चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत १ हजार ५२० कोटी रुपयांचे उत्पन्न डिसेंबर अखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्न २२५ कोटींनी जास्त आहे. मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आर्थिक स्रोत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २०२२-२३ मिळकतकर विभागातून २ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबर अखेरपर्यंत मिळकतकरातून १ हजार ५२० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले असून उर्वरित तीन महिन्यांत नऊशे कोटी रुपये जमा होतील, असा विश्वास महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत १ हजार २९५ कोटींचे उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले होते.

हेही वाचा >>> पुणे : नववर्षाची सुरुवात थंडीने, उत्तरेकडील थंडीच्या लाटेने राज्यात गारवा

महापालिकेकडून मिळकतकराची देयके आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात (एप्रिल) पाठविली जातात. तर देयकांची दोन सहामाहीत विभागणी केली जाते. त्यात पहिली सहामाहीचा कालावधी १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत तर दुसऱ्या सहामाहीचा कालावधीत १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर असा असतो. मिळकतकरधारकांनी ३१ मे पर्यंत कर भरल्यास त्यांना सर्वसाधारण करात ५ ते १० टक्क्यांची सवलत दिली जाते. दुसऱ्या सहामाहीत मिळकतकर न भरल्यास मिळकतधारकांना थकबाकीच्या रकमेवर प्रति महिना दोन टक्के कर आकारला जातो. दंड आकारण्याची ही प्रक्रिया महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : फक्त शंभर रूपये न दिल्याने टोळक्याने महाविद्यालयीन तरुणाचा हात मनगटापासून कापला

समाविष्ट २३ गावांतून १५ कोटी

महापालिकेला प्राप्त झालेल्या १ हजार ५२० कोटी रुपयांमध्ये १५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधून प्राप्त झाले आहे. तर १ हजार ५०५ कोटी रुपये हे शहराच्या जुन्या हद्दीतून प्राप्त झाले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली.

More Stories onपुणेPune
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune residents paid income tax of 1520 crores municipal corporation in the vault pune print news apk 13 ysh
First published on: 02-01-2023 at 10:44 IST