पुणे : महापालिकेचा मिळकतकर भरताना सवलत मिळविण्यासाठी सहा दिवस बाकी राहिले असून, आतापर्यंत सवलतीचा फायदा घेऊन ९३२ कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. ३० जूनपर्यंत मिळकतकराची रक्कम भरणाऱ्या मिळकतदारांना बिलात पाच ते दहा टक्के सवलत दिली जाणार आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. यंदाच्या चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकतकर विभागाला ३२५० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महापालिकेने सुरुवातीचे दोन महिने मिळकतकर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्के सवलत दिली आहे. याचा फायदा घेऊन आतापर्यंत ५ लाख ७९ हजार ५८८ जणांनी सुमारे ९३२ कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.

महापालिकेकडे वेगवेगळ्या प्रकारची सुमारे १७ हजार कोटींची थकबाकी आहे. यामध्ये शहरात असलेल्या मोबाईल टॉवरच्या मिळकतकराची थकबाकी सर्वसाधारण चार हजार कोटी असून, ती सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ दुबार मिळकतकराची थकबाकी ४ हजार कोटींच्या घरात आहे. महापालिकेने जादा मिळकतकर आकारल्याने न्यायालयात दावे दाखल असलेल्या मिळकतकराची दीड हजार कोटींची, तर महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील १९०० कोटींची थकबाकी आहे.

थकीत करवसुलीसाठी नियोजन

‘थकीत मिळकतकरापैकी दुबार आणि समाविष्ट गावांतील कराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जून महिना संपल्यावर थकबाकी वसूल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,’ असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मिळकतकर भरण्याचे प्रकारमिळकतदारांची संख्याजमा रक्कम (कोटी)
ऑनलाईन ४ लाख २ हजार ७९८ ५८२.४१
रोख रक्कम१ लाख १३ हजार ७८०९९. ४९
धनादेश, डीडी६२ हजार ९२०२५०.४९

सवलतीच्या दरात मिळकतकर नागरिकांना भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत आहे. नागरिकांना त्याचा फायदा घेता यावा, यासाठी ऑनलाइन, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंदाजपत्रकात दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.अविनाश सपकाळ, उपायुक्त मिळकतकर विभाग