पुणे : पुणे शहरातील कॅम्प परिसरात एका इमारतीचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील साचा पीर स्ट्रीट रोडवरील एका इमारतीचे दुपारच्या सुमारास स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये चार जण खाली पडले. घटनेमध्ये शुभंकर मंडल या कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या सर्वांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काम करतेवेळी कामगारांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरण वापरली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.