पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणाची २६ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोंढव्यातील भागाेदयनगर परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सप्टेंबर महिन्यात संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला. त्यामुळे तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. गेल्या चार महिन्यांत त्याने वेळोवेळी २५ लाख ९९ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले.

हेही वाचा – “अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, अभिनेते भाऊ कदम यांना विश्वास, आणखी काय म्हणाले?

हेही वाचा – खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी तक्रारदारांना आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.