पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर याचा शुक्रवारी सायंकाळ च्या सुमारास नाना पेठेत दोघांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.तर याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर (वय 70 ) याच्यासह 11 जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.बंडू अण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर,नातू स्वराज वाडेकर,तुषार वाडेकर,अभिषेक आंंदेकर,शिवराज आंदेकर,वृंदावनी वाडेकर,लक्ष्मी आंदेकर,अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील या 11 जणांविरुद्ध कल्याणी गणेश कोमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले,या प्रकरणामधील काही आरोपीना अटक करण्यात आली असून या प्रकरणामध्ये जे कोणी सहभागी असतील,त्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील,तसेच उर्वरित आरोपींना येत्या कालावधीत अटक केली जाईल असे त्यांनी सांगितले.