पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्य पात्रता परीक्षेबाबत (सेट) समाजमाध्यमांवर काही खोटी माहिती प्रसारित केली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने समाजमाध्यमांत खोटी बातमी पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

विद्यापीठातील सेट विभागाने या बाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटला असून, प्रश्नपत्रिका मिळण्याबाबतची श्राव्यफित समाजमाध्यमात फिरत असल्याचा प्रकार एका युट्यूब वाहिनीद्वारे निदर्शनास आला. त्यामुळे सेट परीक्षेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची दखल घेत विद्यापीठाच्या सेट विभागाने  बुधवारी रात्री सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठातील सेट परीक्षा विभागातर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेतली जाते. येत्या १५ जून रोजी ४० वी सेट परीक्षा १८ शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.