पुणे : मागील काही महिन्यांपासून सर्वच आमदारांना कोणताही निधी मिळत नाही.काही लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकार सध्या अडचणींतून चालले आहे.पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितल आहे की, लवकरच आपली परिस्थिती सुधारेल आणि राज्याचीही परिस्थिती पूर्ववत होईल असे सांगितले आहे.याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विधान केल्याने सत्ताधारी पक्षातील आमदारांने घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.

यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली असून त्याच दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विश्वजीत कदम हे पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी त्यांना संजय गायकवाड यांच्या विधाना बाबत विचारले असता ते म्हणाले, विधिमंडळामध्ये अनेक योजनांच्या घोषणा केल्या जातात. त्यासाठी तरतूद केली जाते.पण पुढे काहीही काम होत नाही.ही परिस्थिती मागील अनेक महिन्यापासून असून राज्यातील अनेक विकास काम थांबलेलले आहेत. या राज्य सरकारला गुडघ्यावर आणण्याच काम या सत्ताधारी पक्षाने केल आहे.या एकूणच निधी वाटपाबाबत सत्ताधारी पक्षातील आमदार संजय गायकवाड यांनी मोठ्या धाडसाने वस्तूस्थिती मांडली. त्यामुळे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना समान निधी दिला गेला पाहिजे,तो लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असला तरी राज्यातील प्रत्येक भागातील विकास काम झाली पाहिजे,नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.