पुणे : शस्त्राचा धाक दाखवून आणि मारहाण करून तरुणाकडील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (२७ मे) रात्री साडेअकराच्या सुमारास भैरोबा नाला परिसरातील एएफएमसी बसस्थानक परिसरात घडली.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी स्वारगेट पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या किसन सुरेश नुया (वय ३२) या रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फुलचंद राठोड (वय ३७, रा. वारजे माळवाडी ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राठोड वारजे माळवाडीत राहायला असून, २७ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास एएफएमसी बसस्थानक परिसरात थांबले होते. त्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या किसन नुया याने त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. ‘मला पैसे दे, नाही तर तुला मी मारून टाकेन’, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर आरोपीने राठोडला मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्या खिशातील साडेतीन हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधला असून, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.