पुण्याच्या बावधनमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयने आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचं समोर आले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना बावधन येथील एका सोसायटीमध्ये घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  निखिल विलास भालशंकर (३०) असे आरोपीचे नाव असून तो झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी करतो. ही घटना समोर आल्यानंतर या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बावधन येथील एका सोसायटीमध्ये आरोपी निखिल विलास भालशंकर हा फूड डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. त्याच वेळेस त्या सोसायटीमध्ये राहणारी आठ वर्षी मुलगी खेळून घरी परतत होती. तेव्हा, आरोपी निखिलने तिला थांबवून हाताने अश्लील कृत्य करत हस्तमैथुन करण्यास सांगितले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार मुलीने घरी सांगितला. घरातील व्यक्ती आणि इतरांनी आरोपीचा शोध घेतला पण तो पसार झाला होता.

सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेमध्ये आरोपी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय असल्याचं पुढे आलं. त्यानंतर आरोपीला पुन्हा बोलावून त्याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे या करत आहेत.