पुणे : शहर आणि परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान हलका पाऊस झाला. त्यानंतर सव्वाअकरा वाजता पुन्हा चांगल्या सरी पडल्या. शहर आणि परिसरात मोसमी पाऊस सदृश्य हवामान असून, हवामान विभागाकडून अधिकृतपणे मोसमी पाऊस दाखल झाल्याची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते.

पुणे, मुंबईत मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वीच विदर्भात मोसमी पाऊस दाखल झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईत कधी पाऊस सुरू होणार, अशी चर्चा सुरू होती. शनिवारी सकाळी आनंद सरींचा वर्षाव सुरू झाला आहे. मोसमी पाऊस दाखल झाल्यासारखे वातावरण आहे. गारवा निर्माण झाला आहे. संततधार पाऊस सुरू आहे. सकाळी हलक्या सरी झाल्या आणि अकरा वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे.

हेही वाचा – पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिला पोलिसांच्या तक्रारी… ‘असा’ दिला त्रास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाकडून अधिकृतरित्या पुण्यात मोसमी पाऊस दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, हवामान विभाग कोणत्याही क्षणी पुण्यात मोजणी पाऊस दाखल झाल्याची घोषणा करू शकतो, अशी स्थिती आहे.