पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलावर बालत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजा मारणेचा २२ वर्षीय मुलगा प्रथमेश मारणेवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी प्रथमेश मारणे गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी आरोपीने काही व्हिडिओ तयार केले होते. पीडित तरुणीने व्हिडिओ डिलीट कर अशी विनंती अनेक वेळा केली होती. पण आरोपीने काही ऐकले नाही आणि तिला धमकी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित तरुणीने सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर आरोपी प्रथमेश गजानन मारणे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं सिंहगड पोलिसानी सांगितलं आहे.