पुणे : रुग्ण महिलेचा विनयभंग ; डॅाक्टरवर गुन्हा

डॅा. धाडिवाल यांचे कोंढवा परिसरात डॅा. धाडीवाल पॅालीक्लिनिक रुग्णालय आहे.

पुणे : रुग्ण महिलेचा विनयभंग ; डॅाक्टरवर गुन्हा
( संग्रहित छायचित्र )

रुग्ण महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका डॅाक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा भागात ही घटना घडली.या प्रकरणी डॅा. धाडिवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डॅा. धाडिवाल यांचे कोंढवा परिसरात डॅा. धाडीवाल पॅालीक्लिनिक रुग्णालय आहे. तक्रारदार महिला आजारी असल्याने तपासणीसाठी डॅा. धाडिवाल यांच्या रुग्णालयात गेली होती. त्या वेळी डॅा. धाडिवाल यांनी अश्लील कृत्य केले, असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rape of patient woman a crime against a doctor pune print news amy

Next Story
गोदामाची भिंत फोडून साडेबारा लाखांच्या वाईनच्या बाटल्या लंपास; सासवड रस्त्यावरील घटना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी