पुण्यातील हिंजवडीमधील एका खासगी कंपनीच्या कॅंटिनमध्ये काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कॅंटिनमध्येच काम करणाऱ्या दोघांना अटक केली. परितोष बाग (वय २१, रा. हिंजवडी, मूळ रा. प. बंगाल), प्रकाश महाडीक (वय ३०, रा. हिंजवडी) अशी या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला हिंजवडीतील खासगी कंपनीच्या कॅंटिनमध्ये कॅशिअर म्हणून काम करते. गेल्या रविवारी तेथील दोघांनी तिला कॅंटिनच्या स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची छायाचित्रेही टिपण्यात आली आणि या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता केल्यास छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जातील, अशी धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने लगेचच पोलिसांकडे तक्रार करण्यास धाव घेतली नाही. अखेर मंगळवारी तिने पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. हिंजवडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2015 रोजी प्रकाशित
हिंजवडीतील कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार, दोघांना अटक
पीडित महिला हिंजवडीतील खासगी कंपनीच्या कॅंटिनमध्ये कॅशिअर म्हणून काम करते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 29-12-2015 at 12:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape on women working in private company at hinjawadi