उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह झालेल्या बैठकीत निर्णय
पुणे : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या रानडे इन्स्टिटय़ूटमधील अभ्यासक्रमाचे स्थलांतर कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रानडे इन्स्टिटय़ूटला भेट देऊन विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. नितीन करमळकर आणि पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठाने प्रशाला प्रणालीसाठीच्या बदलांचा भाग म्हणून रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये चालणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यापीठात स्थलांतर करण्याचा, तसेच संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यापीठातील संज्ञापन आणि माध्यम अभ्यास विभागात विलीनीकरण करून संज्ञापन, पत्रकारिता आणि माध्यम अभ्यास विभाग हा नवा विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला माजी विद्यार्थी, विविध संघटना आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाने विरोध के ला.
या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी रानडे इन्स्टिटय़ूटला भेट देऊन कु लगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कु लगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कु लसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार, विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, माजी विद्यार्थी, संघटनांचे प्रतिनिधी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर अशा विविध घटकांसह चर्चा के ली. त्यानंतर विभागाचे स्थलांतर आणि विलीनीकरण कायमस्वरुपी रद्द करण्याच्या निर्णयाचे परिपत्रक कु लसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले.
सामंत म्हणाले, की रानडे इन्स्टिटय़ूट ही वारसा वास्तू आहे. पत्रकारितेचे अनेक वर्षे शिक्षण देणारी रानडे इन्स्टिटय़ूट के वळ पुण्याची नाही, तर राज्याची, देशाची आहे. संस्थेची जागा कायमस्वरुपी विद्यापीठाकडे आली पाहिजे. त्या दृष्टीने संस्थेच्या जागेसंदर्भातील न्यायप्रविष्ट प्रकरणात विद्यापीठाला बाजू मांडायची असल्यास शासनाकडून आवश्यक ती मदत के ली जाईल. विभागाचे स्थलांतर कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
प्रधान सचिवांची एकसदस्यीय समिती
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. विभागाच्या साधनसुविधांचे अद्ययावतीकरण, न्यायालयीन अडचणी आदींबाबत समितीकडून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.