scorecardresearch

Premium

काम करण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची टाळाटाळ… ‘हे’ आहे कारण

निवडणुकीचे कामकाज असल्याचे कारण पुढे करत महापालिकेचे कामकाज करण्यास या कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे.

Reluctance of municipal employees for work
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेकडील एक हजार मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मात्र निवडणुकीचे कामकाज असल्याचे कारण पुढे करत महापालिकेचे कामकाज करण्यास या कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मूळ जबाबदारी सांभाळून निवडणूक आयोगाचे कामकाज करावे, असे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी काढले आहे.

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
ravindra-dhangekar-12
आंदोलन करणाऱ्या मविआच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची धक्काबुक्की; आमदार धंगेकर म्हणाले, “पुणे पोलिसांची…”
Mumbai Highcourt
“मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले
Street Food Zone Pune Municipal corporation street vendors committee marathi news
पुण्यात खाऊ गल्लीसाठी महापालिकेचे नवे धोरण

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. त्यासाठी महापालिकेसह अन्य शासकीय यंत्रणातील कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना शहरातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. यात महापालिकेचे सुमारे एक हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-पुण्यात मेट्रो मार्गांचा तिढा! पीएमआरडीए, महामेट्रोची समान मार्गांकडे धाव

निवडणूक विभागाचे काम महापालिकेच्या कामकाजाची मूळ जबाबदारी सांभाळून करणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणूक विभागाचे काम असल्याचे सांगून महापालिकेच्या कामकाजाकडे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असून कामे रखडत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी हा आदेश काढला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे बिनवडे यांनी या आदेशात नमूद केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reluctance of municipal employees to work know the reason pune print news apk 13 mrj

First published on: 20-09-2023 at 14:55 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×