लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: नगर रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीवरील निवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले दाम्पत्य शहरातील कसबा पेठेत राहायला होते. शेतीच्या कामासाठी ते गावी जात असताना दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक देऊन डंपरचालक पसार झाला.

अशोक मार्तंड काळे आणि त्यांची पत्नी वर्षा (दोघे रा. कसबा पेठ) अशी मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. अशोक काळे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. काळे यांची तालुक्यातील राहू गावाजवळ शेती आहे. शेतीच्या कामासाठी काळे दाम्पत्य बुधवारी (२६ एप्रिल) दुपारी एकच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाले होते. नगर रस्त्यावरील वाघोलीजवळ केसनंद फाटा येथे दुचाकीस्वार काळे दाम्पत्य वळत होते. त्या वेळी भरघाव वेगाने निघालेल्या डंपरने दुचाकीस्वार काळे दाम्पत्याला धडक दिले. अपघातानंतर काळे दाम्पत्याला डंपरने फरफटत नेले. काळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक भास्कर पंढरीनाथ कंद डंपर घटनास्थळी सोडून पसार झाला.

आणखी वाचा- पिंपरी : काम दिले जात नसल्याने पीएमपीएमएलच्या कंत्राटी बस चालकाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी पोलिसांना केला होता फोन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर नगर रस्त्यावरील केसनंद फाटा चौकात काही वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तसेच लोणीकंद पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.