scorecardresearch

हडपसर भागात सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनाची रिक्षाला धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू

या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून. तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हडपसर भागात सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनाची रिक्षाला धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू
हडपसर भागात सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनाची रिक्षाला धडक

पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर भागात सिमेंट वाहतूक करणाऱ्या मिक्सरने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा- खोदकामात सोन्याची विट, हिरे सापडल्याची बतावणी ; माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकाची दहा लाखांची फसवणूक

जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर

हडपसर भागातील आकाशवाणी केंद्राजवळ गुरुवारी (२९ सप्टेबर) सकाळी आठच्या सुमारास भरधाव सिमेंट वाहतूक करणाऱ्या मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटले. मिक्सर पुण्याकडे निघाला होता. मिक्सर एका रिक्षावर आदळला. अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून ३ प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या