पुणे : राज्यात तलाठी पदासाठीच्या भरती प्रक्रियेतील परीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू झाली. ही परीक्षा १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मात्र सोमवारी अनेक जिल्ह्यांत सकाळच्या सत्रातील परीक्षा केंद्रावर ‘सर्व्हर’ बंद पडल्याने परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली.

महसूल खात्याअंतर्गत येणाऱ्या तलाठी पदाच्या चार हजार ६४४ जागांसाठी एका खासगी यंत्रणेच्या माध्यमातून तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार अर्ज आलेले आहेत. या परीक्षेत सोमवारी अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी जिल्ह्यांत नियोजित केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा मुख्य सर्व्हर बंद पडल्याने सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यातून आलेल्या परीक्षार्थींना ताटकळत बसावे लागले. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले.

हेही वाचा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक, हादरा बसेल असे धागेदोरे…

हेही वाचा – पुण्येश्वर मंदिर परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करूनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन, ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरू होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय. या सरकारला काही गांभीर्य आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.