पिंपरी- चिंचवड: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आमदार रोहित पवार यांनी परखड मत व्यक्त केल आहे. शरद पवार आणि पत्रकारांमध्ये अनौपचारिक काय चर्चा झाली, हे मला माहित नाही. त्याबद्दल आजपर्यंत आमच्याशी चर्चा झालेली नाही. कुठलाही संदेश आला नाही. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटल्यानंतर याबाबत चित्र स्पष्ट होईल. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र यायला हवं अस मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. आमदार रोहित पवार आळंदीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, शरद पवार आणि पत्रकारांची अनौपचारिक काय चर्चा झाली हे माहीत नाही. आमच्या बरोबर आजपर्यंत चर्चा झालेली नाही. कुठलाही संदेश आलेला नाही. यावर बोलणं थोडं अवघड आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत बोलल्यानंतर यावर स्पष्ट बोलेल. पुढे ते म्हणाले, रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवारांचे पुतणे आहेत. अशा परिस्थितीत तो विषय कौटुंबिक होतो.

कौटुंबिक विषय झाल्यानंतर आपण भावनिक होतो. कुटूंब एकत्र राहावं ही सर्वांची इच्छा आहे. भारतीय संस्कृती, हिंदू परंपरेत एक राहणं हे लहानपणापासून शिववलेले आहे. त्याला खूप महत्व दिलेलं आहे. मी भावनिक होऊन हेच सांगेल की कुटुंब म्हणून आपण एकत्रित आलं पाहिजे. पुढे ते म्हणाले, पार्टी आणि दोन्ही पक्ष एक आणायचे असतील तर पक्ष प्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अजित पवार यांनी भेटून चर्चा करून निर्णय घ्यावा. तर आम्हाला स्पष्ट भूमिका घेता येईल. अन्यथा यावर बोलता येणार नाही. पुढे ते म्हणाले, याबद्दल शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे निर्णय घेतील.

शरद पवार यांनी सांगितल असेल तर सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्या गोष्टींच आम्ही स्वागत करतो. सुप्रिया सुळे या काय निर्णय घेतात बघावं लागेल. असे निर्णय घ्यायचे असल्यास पक्ष बैठक होते. आम्हाला बोलावलं जात. चर्चा होईल. आमची मत जाणून घेतली जातील. मग, योग्य निर्णय होईल. अद्याप, शरद पवार यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. त्यांच्याशी भेटून बोलेल. सुप्रिया सुळे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्या महत्वाच्या बैठकीत असल्याने त्यांचा संपर्क झाला नाही. आमदारांना विश्वास घेतल्याशिवाय कुठला निर्णय होईल असं वाटत नाही. अस ही रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.