भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच बारामती लोकसभा संदर्भात मोठे वक्तव्य केलं होतं. बारामती लोकसभा ही ५१ टक्के मते घेऊन शंभर टक्के जिंकू असा दावा त्यांनी केला आहे. यावरच शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. रोहित पवार हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

हेही वाचा >>> “बालेकिल्ला कुठल्या एका नेत्याचा नसतो”, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार म्हणाले, बावनकुळे हे नेहमीच बारामती लोकसभा जिंकू असे सांगत असतात. याचा अर्थ ते घाबरले आहेत त्यांना बारामती लोकसभा जिंकण्यात यश मिळणार नाही असे उत्तर रोहित पवार यांनी दिल आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यामध्ये पिंपरी- चिंचवड चा दौरा केला होता. तेव्हा प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामती लोकसभा ५१% मते घेऊन शंभर टक्के जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता. अद्याप त्या ठिकाणचा उमेदवार आमचा ठरलेला नाही. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि केंद्रीय पातळीवर याबाबतचा निर्णय घेऊन मावळ, शिरूर असेल किंवा बारामती असेल या ठिकाणचे उमेदवार ठरवले जातील असं देखील त्यांनी सांगितलं होतं.