पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी काल बंगळुरू येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहीनीमध्ये ११.५० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेते मंडळी यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात का घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट?

हेही वाचा – गिर्यारोहण या साहसी खेळाकडे दुर्लक्ष, छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सकाळी पुण्यातील मोतीबाग येथे सकाळी ९ ते ११ यावेळेत पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते मंडळींनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर मोतीबाग येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांची अंत्ययात्रा ११ वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत काढण्यात आल्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.