पुणे : हडपसर भागात आयाेजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दोन गटांत किरकोळ वाद झाले. शहरात गोळीबाराच्या सलग चार घटना घडल्यानंतर हडपसर भागात गाेळीबार झाल्याची अफवा पसरल्याने पोलिसांची धावपळ उडाली.

हडपसर परिसरातील काळेपडळ येथे आयोजित कार्यक्रमात दोन गटांत किरकोळ कारणावरून हाणामारीची घटना शनिवारी रात्री घडली. त्यावेळी एकाने गोळीबार केल्याची अफवा पसरली होती. हाणामारीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी कार्यक्रम बंद केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबार झाला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या

दोन गटांत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात हडपसर पोलिसांनी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी प्रशांत दुधाळ यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हडपसर भागातील काळेपडळ परिसरातील मारुती मंदिराशेजारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नाचताना दोन गटांत वाद झाला. वादातून दोन गटांत हाणामारी झाली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त होता. तेथे गोळीबार झाला नाही. तेथे फटाके फोडण्यात आल्याने गोळीबार झाल्याची अफवा पसरली असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी दिली.