पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये १७ दिवस उपोषण केलं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाविषयी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतलं. असं असताना शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्री आणि नेते मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी विसंगती असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन आहिर यांनी म्हटलं आहे. एकीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन देत आहेत. तर दुसरीकडे नारायण राणे हे मात्र मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत असं म्हणत आहेत. सचिन आहिर पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आणखी वाचा-भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संघ परिवाराचे विचारमंथन
भाजपामधीलच नारायण राणे हे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत असं म्हणतायेत यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिन अहिर म्हणाले, मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन आश्वासन देतायेत की एक महिन्यात आपण मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेऊ. तर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे म्हणतायेत की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्यामुळे सरकारमध्येच मराठा आरक्षण देण्याविषयी विसंगती आहे. याचा अर्थ असा आहे की यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. दोन्ही बाजूला पाठिंबा द्यायचा. दोघांना कळून चुकलं आहे, की हे सरकार आपली दिशाभूल करत आहे. असं सचिन आहिर म्हणाले आहेत.