लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पोषण आहार योजनेतील तांदळाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अजिनाथ सदाशिव सानप (वय ४१ ,रा. सरनौबतवाडी, कोल्हापूर) , रामराज उर्फ रामभाऊ मोताीराम गोयेकर (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष रामदास फाटके (वय ३०, रा. मांजरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-पुणे: काकूला धमकावून बलात्कार; तरुणाविरुद्ध गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी भागात संस्कार महिला मंडळाचे स्वयंपाक घर आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शासकीय योजनेतील आठ लाख ९६ हजार २०० रुपयांचा तांदूळ सानप आणि गोयेकर यांच्याकडे देण्यात आला होता. दोघेजण टेम्पोतून शासकीय योजनेतील तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन निघाले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांना सापळा लावून पकडण्यात आले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक निरीक्षक आशिष कवठेकर तपास करत आहेत.