वारकऱ्यांना मोफत औषधोपचार; पिंपरी पालिकेचा निर्णय

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा दृकश्राव्य पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न पिंपरी पालिका करणार आहे. तसा निर्यण घेण्यात आला असून त्यासाठी पाच लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

त्यामुळे तुकोबांचे अभंग व भावार्थ मोबाइलद्वारे ऐकता येणार आहेत. यासाठी पाच लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, शहर हद्दीतून जाणाऱ्या पालखीतील वारक ऱ्यांना मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत.

अध्यात्माची आवड निर्माण व्हावी आणि परंपरेची जाणीव असावी, या हेतूने महापालिकेने तुकोबांच्या अभंगांचा अर्थ मोबाइलच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने सर्वत्र पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पाच लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. माउली आणि तुकोबांची पालखी पालिका हद्दीतून जाते. यातील वारक ऱ्यांना दरवर्षी मोफत औषधोपचार केला जातो. याही वर्षी ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. २७ ते २९ जून दरम्यान पालख्या शहर हद्दीतून जाणार आहेत. त्या वेळी वारक ऱ्यांना मोफत औषधे दिली जाणार आहेत.