scorecardresearch

पुणे: अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद, अमोल वाघमारे युवा पुरस्काराचे मानकरी

विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी पुरस्कारांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (संग्रहित छायाचित्र)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दरवर्षी देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद, अमोल वाघमारे युवा पुरस्काराचे मानकरी ठरले असून, १० फेब्रुवारीला विद्यापीठाच्या वर्धापन दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतील. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी पुरस्कारांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. या वर्षीचा कला क्षेत्रातील युवा पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता माळीला जाहीर झाला आहे. तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार प्रीयेशा देशमुख, संशोधनातील पुरस्कार डॉ.रणजित काशिद यांना तर समजकार्यातील पुरस्कार डॉ.अमोल वाघमारे यांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>पुणे : माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणारे तिघे गजाआड

व्यावसायिक अभ्यासक्रम शहरी विभागासाठी आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, ग्रामीण भागातील पुरस्कार नाशिकच्या डॉ. जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी, बिगरव्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये शहरी विभागातील पुरस्कार नाशिकच्या एस. व्ही. के. टी. महाविद्यालयाला, तर ग्रामीण भागातील पुरस्कार बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बारामती यांना जाहीर झाला.उत्कृष्ट विद्यापीठ विभाग पुरस्कार सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला, उत्कृष्ट नावीन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ. माधुरी जावळे, डॉ. चारुशीला पाटील यांना, उत्कृष्ट संशोधन पुरस्कार विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. पूजा दोशी यांना देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>पुणे : दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणातील तीन मृतांचे पुन्हा शवविच्छेदन

उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ. रजनीश स्वाती बार्नबस, डॉ.सुभाष अहिरे यांना, उत्कृष्ट संचालक, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा पुरस्कार हा डॉ. आशा बेंगाळे, डॉ.दत्तात्रय शिंपी, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अध्यापक पुरस्काराने डॉ. रवींद्र चौधरी यांना गौरवण्यात येणार.उत्कृष्ट प्राचार्य-संचालक पुरस्कार डॉ. केशव नांदुरकर, डॉ. अदिशेशैया मेडा, डॉ. बापू जगदाळे, डॉ. पंडित शेळके यांना, तर उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. योगिनी बोरोले, डॉ. राजश्री पटवर्धन, डॉ. मनोज पाटील यांना प्रदान करण्यात येईल.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 17:17 IST