चीनमध्ये वाढलेल्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे विमानतळावर उतरणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांचे नमूने घेऊन आरटीपीसीआर चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे: विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी अग्रवाल समाजाचा पुढाकार महत्त्वाचा; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अपेक्षा

गेल्या काही दिवसांमध्ये चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे करोना प्रादुर्भावाची चर्चा जगभरात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले आहेत. त्यानुसार दोन टक्के आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे नमूने घेऊन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रवाशांची तापमान मोजणी करण्यात येत आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणीसाठी दोन टक्के आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे नमूने पुणे महापालिकेतर्फे घेण्यात येत आहेत, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.