बाणेर भागात सोसायटीच्या पार्किगमध्ये खेळणारी अल्पवयीन शाळकरी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीशी लगट करणाऱ्या सुरक्षारक्षकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.अहमद जलालउद्दीन हुसेन (वय २०, रा. हाटकोला, जि. करीमगंज, आसाम) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाणेर भागातील एका सोसायटीत हुसेन सुरक्षारक्षक आहे.

हेही वाचा >>>पुणे: शहरातील फलकबाजीविरोधात ‘पीपीसीआर’तर्फे ‘नो फ्लेक्स’ मोहीम

तक्रारदार महिलेची दहा वर्षांची मुलगी आणि तिची मैत्रीण सोसायटीच्या आवारात खेळत होती. त्या वेळी हुसेन याने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलगी आणि मैत्रिणीचे मोबाइलवर छायाचित्र काढले. या प्रकाराची माहिती मुलीने आईला दिली.त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) आणि विनयभंग केल्या प्रकरणी सुरक्षारक्षक हुसेन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार वणवे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.