पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कामांनी वेग घेतला असून डाॅ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामासाठीची निविदा उघडण्यात आली आहे. या निविदेला मान्यता देण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: बांधकाम व्यवसायिकांच्या मनमानी कारभाराला बसणार चाप; महारेराच्या वसुली वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक अधिकारी

महापालिकेने धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. सध्या कमला नेहरू रुग्णालय आणि बाबूराव सणस शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या वर्गांमध्ये अध्यापन सुरू आहे. डॉ. नायडू रुग्णालयाच्या इमारतीमध्ये काही बदल करून द्वितीय वर्षाचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच वेळी या रुग्णालयाच्या आवारातील जागेवर महाविद्यालय आणि रुग्णालयासाठीची स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.

हेही वाचा >>>भीमा- कोरेगाव अभिवादन शांततेत पार पाडण्याचे आंबेडकरी संघटनांचे आवाहन; करणी सेनेवर कारवाईची मागणी

‘जेनेरिक इंजिनीअरिंग कन्स्ट्रक्शन ॲण्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड’ या मुंबईतील बांधकाम कंपनीची निविदा सर्वांत कमी दराने अर्थात महापालिकेने जाहीर केलेल्या दरानेच आली आहे. या कंपनीची १०९ कोटी रुपयांची ही निविदा स्थायी समिती बैठकीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separate building to be constructed for medical college of pune municipal corporation pune print news apk 13 amy
First published on: 31-12-2022 at 11:03 IST