पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांची शनिवारी तब्बल २५ वर्षानंतर भेट झाली. शरद पवार यांनी थोपटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत भोर येथे शेतकरी मेळावा होत असून महविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला संबोधित करणार आहेत. मात्र, मेळावा सुरू होण्याआधी शरद पवार यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची निवासस्थानी भेट घेतली.

हेही वाचा >>> पुणे : एकतर्फी प्रेमातून महिलेसह सासूवर हल्ला; हल्लेखोर तरुण पसार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम थोपटे, माजी खासदार विदुरा नवले, महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी या वेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान थोपटे कुटुंबातील अनंतराव थोपटे, त्यांचे पुत्र संग्राम थोपटे, संग्राम थोपटे यांची पत्नी स्वरूपा थोपटे, संग्राम थोपटे यांचा मुलगा पृथ्वीराज थोपटे आणि मुलगी तेजस्विनी थोपटे उपस्थित होते. भोरमध्ये सोनिया गांधी यांची सभा आयोजित करून २५ वर्षांपूर्वी अनंतराव थोपटे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये होते. सोनिया गांधी यांच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून त्यावेळी नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार काशिनाथ खुटवड यांनी अनंतराव थोपटे यांचा पराभव केला होता.