मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत ‘ऑन कॅमेरा’ थुंकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. वादानंतर संजय राऊतांनी जीभेचा त्रास असल्याचं सांगत त्यावर स्पष्टीकरणही दिलं. मात्र, त्यानंतरही त्याचे राज्यभर पडसाद उमटत असून शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी (३ जून) पुण्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेनंतर माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत थुंकल्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, “हे काही राष्ट्राचे, राज्याचे प्रश्न नाहीत. मी त्यावर भाष्यदेखील करू इच्छित नाही आणि त्याला महत्त्वही देऊ इच्छित नाही.”

“महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार प्रकरणाची केंद्राने गांभिर्याने नोंद घ्यावी”

भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपाचे खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावरून वाद निर्माण झाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि विशेष सर्व साधारण सभेचं पुण्यातील वारजे येथे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा : ओडिशातील भीषण अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया, लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख करत म्हणाले, “राजीनामा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सभेला राज्यभरातील ४५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्या सभेतील ठरावाबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, “दिल्ली येथील महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे. त्याबाबत केंद्र सरकारने गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच त्या प्रकरणी दिल्ली सरकारने लक्ष घालून त्या मुलींना न्याय द्यावा. याबाबत बैठकीत ठरावही करण्यात आला आहे.”