शिरूर : पूर्ववैमनस्यातून शिरूर शहरात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. शिरूर बाह्यमार्ग उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर दोन तासांत शिरूर पोलिसांनी आरोपींना अटक केली.
संतोष मारूती ढोबळे (वय २०, रा. वाडा कॉलनी, शिरूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन विलास मांमडवाड (वय २४, रा. सिद्धार्थनगर, शिरूर), यश उर्फ श्रेयस महेश मांदीलकर (वय २०, रा. साईनगर, शिरूर) यांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून आरोपींनी ढोबळे याला मारहाण केली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण, ‘सीसीटीव्ही’तील चित्रीकरणाच्या आधारे तपास करण्यात आला असता, आरोपी साईनगर परिसरात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले.
पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये केेंजळे आणि शिळीमकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सागर शेळके, राहुल भागवत, हनमंत नकाते, गोविंद खटींग, हवालदार नितीन सुद्रीक, परसराम सांगळे, अक्षय कळमकर, सचिन भोई, विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, अन्य पाटील, रवींद्र काळे, वैभव शेलार, रवींद्र आव्हाड यांचा सहभाग होता.