लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: शाहीर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपट चांगल्याप्रकारे सुरू असताना ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा विनामूल्य दाखवला जाणे चुकीचे आहे, अशा शब्दांत शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली.

चिंचवड येथील एका खासगी कार्यक्रमात डॉ. कोल्हे बोलत होते. सध्या द केरला स्टोरी हा चित्रपट गाजत आहे. लव्ह जिहाद या विषयावर असलेला हा चित्रपट भाजपच्या नेत्यांकडून प्रेक्षकांना विनामूल्य दाखवला जात आहे. या अनुषंगाने डॉ. कोल्हे यांनी टीका केली.

आणखी वाचा-“‘द केरला स्टोरी’ला मराठी सिनेसृष्टी पाठिंबा का देत नाही?” अमृता खानविलकर म्हणाली “कारण ‘महाराष्ट्र शाहीर’…”

डॉ. कोल्हे म्हणाले, की कलाक्षेत्रातून राजकारणात आल्यानंतर निवडून आलेला मी पहिला मराठी कलाकार आहे. हे महाराष्ट्रातील मतदारांना नवीन आहे. तुमच्या खासदाराचे उत्पन्नाचे साधन काय आहे, याचा विचार केला जात नाही. यासाठी राजकीय साक्षरता आवश्यक आहे. तुमचा “गोविंदा” होऊ देऊ नका, असे मला सुरुवातीला सांगणारे आता दूरध्वनी करून शाबासकी आणि शुभेच्छा देतात, याकडे डॉ. अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधले. थिएटर आणि शो मिळत नाही म्हणून टीडीएम या मराठी चित्रपटातील कलावंतांना अश्रू अनावर झाले. अशी वेळ येणे दुर्देवी गोष्ट आहे.

आणखी वाचा-‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, अवघ्या पाच दिवसात जमावला ५० कोटींचा गल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन गडकरी यांनी शिरूर मतदारसंघात रस्तेविकासासाठी भरघोस निधी दिला. राजकारणात शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना मतदार नाकारतात. पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणेच १३ राज्यात रेड झोनची समस्या आहे. बैलगाडा शर्यत केवळ नाद नाही, तर देशी गोवंशाचे रक्षण आहे. मतदारसंघात संपर्क कमी आहे, हे मान्य. मात्र, विकासकामांसाठी आवश्यक पाठपुरावा सुरू, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.