धरणक्षेत्रातील संततधारेमुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतर सहा ठिकाणे धोकादायक असल्याचे स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षाकडून जाहीर करण्यात आले. खडकवासला साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगांव, टेमघर आणि खडकवासला ही चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने शुक्रवारी दुपारनंतर विसर्ग वाढविण्यात आला.

हेही वाचा : आता सर्व गोवंशाचे लसीकरण ; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षाकडून काही ठिकाणी धोक्याची सूचना देण्यात आली. धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने बालेवाडी-हिंजवडी रस्ता, संगमवाडी पूल, औंध येथील राजीव गांधी पूल, भाऊसाहेब पाटील पूल, महर्षी शिंदे पूल आणि होळकर पूल परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला. संगम रस्ता, उत्तमनगर (इंदिरानगर),कोंढवे-धावडे, चंद्रमणी नाला, कात्रज परिसरातून जाणाऱ्या मुंबई महामार्ग आणि हडपसर तसेच मुंढवा भागालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला