लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भरधाव बसने पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला धडक दिल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली. अपघातात पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

12-year-old girl diagnosed with Guillain-Barre syndrome
‘जीबीएस’ची चंद्रपूर जिल्ह्यात धडक, १२ वर्षीय मुलीला लागण; आरोग्य यंत्रणेकडून लपवाछपवी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
pune Senior writer Madhu Mangesh Karnik said marathi bhashela urlisurleli nidi deu naka
‘मराठीला उरलासुरला निधी नको;’ ज्येष्ठ साहित्यिकाने सरकारला सुनावले खडे बोल
palghar social worker Ashok Dhodi kidnapped murdered
अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत
Guillain-Barré Syndrome in Kolkata
‘जीबीएस’चे आता महाराष्ट्राबाहेरही थैमान; कोलकातामध्ये दोन मुलांचा मृत्यू
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
children of divorced parents at higher risk of a stroke
आई-वडिलांचा घटस्फोट मुलांसाठी ठरतोय जीवघेणा? कारण काय? नवीन संशोधन काय सांगते?

जयंत भामरे (वय ६३, रा. ग्रीनवुड्स, मांजरी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. अपघातात भामरे यांची पत्नी वैशाली गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत भामरे यांची मुलगी प्रियांका (वय २८) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बस चालक संजय उज्जैनराव दिंडे (वय ४६, रा. संतकृपा सोसायटी, चिखली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-महिलेचा व्हिडिओ व्हायरल करणार्‍या आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामरे दाम्पत्य शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते. शेवाळवाडी भाजी मंडईजवळ रस्ता ओलांडणाऱ्या भामरे दाम्पत्याला भरधाव बसने धडक दिली. अपघातात जयंत आणि त्यांची पत्नी वैशाली जखमी झाल्या.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना ताताडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच जयंत यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले तपास करत आहेत.

Story img Loader