शहरात ई-बाईक धावण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ई-बाईक सेवेसाठी पुढील सहा महिन्यात आवश्यक त्या पायाभूत सुविधा महापालिकेकडून निर्माण केल्या जाणार आहेत. दरम्यान, ई-बाईक सेवेसाठी पहिल्या टप्प्यात अडीचशे ठिकाणी चार्जिंग स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. ई-बाईकसाठी व्हिट्रो कंपनीचा प्रस्ताव मार्च २०२२ मध्ये स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला होता. यामध्ये ७८० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणे, त्याठिकाणी जाहिरात करण्याचे हक्कही कंपनीला देण्याबरोबरच आकाशचिन्ह विभागातर्फे वार्षिक २२२ चौरस मीटर इतके शुक्ल आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

व्हिट्रो कंपनी प्रत्येक जागेसाठी वर्षाला सुमारे १ लाख रुपये भाडे, तसेच सर्व स्टेशनसाठी साधारण तीन लाख आणि एकूण नफ्याच्या २ टक्के नफा महापालिकेला देणार आहे. त्यामुळे चार्जिक स्टेशनच्या जागा पुढील ३० वर्षासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ७८० जागांपैकी ५०० जागा कंपनीला द्याव्यात, त्यापैकी २०० ठिकाणीच चार्जिंग स्टेशन असतील, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

हेही वाचा : पुणे : ‘किबे लक्ष्मी थिएटरचा’ आज वर्धापनदिन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या टप्प्यात २५० ठिकाणी ई-बाईक सेवा देण्यात येणार आहे. तेथेच चार्जिंग स्टेशनची सुविधा असणार आहे. सहा महिन्यात सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील त्यानंतर ही सेवा पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. ई-बाईकसाठी प्रत्येक किलोमीटरासाठी एक रुपया साठ पैसे एवढे शुल्क आकारले जाणार आहे.