कबड्डी महर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे आणि बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनतर्फे आयोजित शुक्रवारपासून (१५ जुलै) श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आणि पुणे लिग कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी पुरुषांचे १६ संघ आणि महिलांचे १६ संघ निवडण्यात आलेले आहेत. तर पुणे लिग कबड्डी स्पर्धेसाठी पुरुषांचे ८ संघ आणि महिलांचे ६ संघ निवडण्यात आलेले आहेत. महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि क्रीडा संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून २३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य बाबुराव चांदेरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र आंदेकर, मधुकर नलावडे,वासंती बोर्डे – सातव, शकुंतला खटावकर , सुनील चांदेरे, महादेव कोंढरे पुणे लिग कबड्डी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष समीर चांदेरे उपस्थित होते.