निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील दोन आणि शिक्षक मतदारसंघातील तीन जागांसाठीची आचारसंहिता २९ डिसेंबरपासून तत्काळ लागू केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या राज्य शिक्षक पुरस्कारांना बसला असून, आता पुरस्कार प्रदान कार्यक्रम अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे.
हेही वाचा- पुणे : बारावी, दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
शालेय शिक्षण विभागाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करत ३ जानेवारीला पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र लगेचच शुक्रवारी नवा अध्यादेश प्रसिद्ध करून पुरस्कार प्रदान कार्यक्रम स्थगित करण्याचे जाहीर करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील दोन आणि शिक्षक मतदारसंघातील तीन जागांसाठीची आचारसंहिता २९ डिसेंबरपासून तत्काळ लागू केल्याने पुरस्कार प्रदान कार्यक्रम स्थगित करावा लागला आहे. आता पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचा दिनांक यथावकाश कळवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.