महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची, तर २ ते २५ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. राज्य मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

हेही वाचा- पुणे: छायाचित्र काढत असताना युवतीचा मोबाइल हिसकावून चोरला; सारसबाग परिसरातील घटना

mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
Election Commissions eye on the content of Paid News and Social Media here is Regulations
सावधान! ‘पेडन्यूज’ व ‘सोशल मीडिया’वरील मजकुरावर आयोगाची नजर, जाणून घ्या नियमावली
Changes in Composite Assessment Test Exam Schedule
संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल
Civil Services Exam
UPSC Prelims 2024 : यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलली, आयोगाने दिलं ‘हे’ कारण…

पुणे, नाशिक, लातूर, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण या विभागीय मंडळामार्फत होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळातर्फे १९ सप्टेंबरला जाहीर करण्यात आले होते. तसेच वेळापत्रकाबाबतच्या लेखी सूचना पंधरा दिवसांत मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार संघटना, पालक, शिक्षक यांच्याकडून आलेल्या सूचना विचारात घेऊन बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, श्रेणी परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल, असे मंडळाने नमूद केले.

हेही वाचा- पुणे: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उद्या २७०० पोलीस तैनात; गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर

राज्य मंडळाने अंतिम केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून करण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीपुरती आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे येणारे छापील स्वरुपातील वेळापत्रक अंतिम असेल. छापील वेळापत्रकावरून परीक्षांच्या तारखांची विद्यार्थ्यांनी खात्री करून घेऊन परीक्षा द्यावी. तसेच अन्य संकेतस्थळावरील किंवा समाजमाध्यमातील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही मंडळाने स्पष्ट केले.